Sunday, August 25, 2019


'इगो "

       एक  कावळा पायाच्या पंजात मांसाचा तुकडा घेऊन आकाशा  मध्ये  उडत होता .त्याचा विचार होता की एका शांत ठिकाणी जाऊन तो मांसाचा तुकडा गट्ट करावा . आशा वेळी  त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याचा पाठलाग करत आहेत . कावळ्या ला वाटले की ते त्याला मारून टाकण्यासाठी त्याचा  पाठलाग करत आहेत .या भितीने   जिवाच्या अकांतेने  तो उंच उडत होता. त्याला काही उंच उडता येत नव्हते .त्याचा श्वासो श्वास  कोंडत होता . हे सर्व एका झाडावर बसलेल्या गरुडाने पहिले. तो त्या कावळा जवळ आला आणि त्याला म्हणाला तू का एवढा जिवाच्या अकांतेने  उडत आहे , आणि  खूप घाबरलेला आहेस  का ? त्यावर कावळा त्याला म्हणतो काही गिधाडे बराच वेळ झालं माझा पाठलाग करत आहेत. भवतेक  ते मला मारून टाकण्यासाठी माझा  पाठलाग करत आहेत .
       यावर गिधाड त्याला म्हणते कि ते तुला  मारून टाकण्यासाठी तुझा पाठलाग करत नाहीत तर तुझा या पायाच्या पंजात असलेल्या  मांसाचा तुकड्यासाठी  ते तुझा पाठलाग करत  आहेत . तो मांसाचा तुकडा तू सोडून दे बघ काय घडतं .असे सांगून गरुड निघून जातं . मग कावळा आपल्या पायाच्या पंजातील  मांसाचा तुकडा सोडून देतो .आणि एका झाडावर जाऊन बसतो .तर होतं काय कि त्याचा  पाठलाग करणारी गिधाडे मांसाचा तुकडा मागे निघून जातात .
       असंच  माणसाचं पण असतं असाच एक मांसाचा तुकडा डोक्यांत  ठेऊन ती आयूष्य जगत असतात. तो  मांसाचा तुकडा म्हणजे  'इगो " , ''इगो "म्हणजे '' मी पणा '' ,काही विचित्र भ्रामक कल्पना , जे प्रत्येक्षात आस काही नाही  पण  त्याच्या  मानाने ठरवलेलं .
      '' मी '' आणि  ''मीच '' ........ 'मी ' पणाला आपण  आयुष्यामध्ये  जास्त  महत्व देतो .  'मी   सर्वांनी पेक्षा हुशार आहे , जे काही येत ते मलाच येत , माझं खूप शिक्षण झाले आहे , माझ्या शिवाय ते काम होऊच शकत नाही. कुटुंब  मध्ये सर्वांनी मला  विचारले पाहिजे . आशा कितीतरी भ्रामक कलपना , विचार आपल्या मनात येत असतात , ज्याला काही महत्व नाही . म्हणून मला असं वाटते कि माणसाने माणसांशी माणुसकीने वागले पाहिजे कारण प्रत्येक   व्यक्ती कडे काही ना काही स्पेशालिटी असते . देवाने  देताना  प्रत्येक माणसाला काहीतरी स्पेशल गुणधर्म दिलेले असतात ,असा कोणताच व्यक्ती नाही कि त्याचाजवळ घेण्यासारखं काही नाही . फक्त  आपल्याला ते ओळखता आले पाहिजे ,आणि ओळखण्याची नजर आपल्याकडे हवी . मग मित्रांनो  हा  'मी पणा ' कशासाठी  ........

            ज्या व्यक्ती जवळ 'मी पणा ' आहे ना अशी व्यक्ती आकाशात कधीच उंच भरारी घेऊ शकत नाही आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये  'मी पणा ' जागाच नाही . आशा कित्येक व्यक्तीने आकाशात उंच भरारी घेतलेली आपण पाहत आहोत . मग बघा डोक्यांत असलेला 'मी पणा '  मांसाचा तुकडा सोडून.काय बदल घडतो .
       
           जीवनामध्ये माणूस  म्हणून जगल्याचे समाधान   , आणि आकाशात घेतलेली  उंच भरारी  ''जीवन जगण्याचा  '' अर्थ पूर्ण  करून जाईल . मग मित्रांनो सोडाल ना डोक्यांत असलेला 'मी पणा ' मांसाचा तुकडा .......

बाप का बापडा ?                   स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते . आणि पतीचा हात धरते . पस्तीशी चाळीशीपर्यंत त...