Thursday, October 10, 2019

कोकणची सहल  .........

                                                                   



                     माझ्या जिवनातील एक अविस्मरणीय क्षण म्हणजे मी माझ्या मित्र मैत्रिणी समवेत केलेली कोकणची सहल , मित्र -मैत्रिणी  म्हटलं कि गप्पा , गोष्टी , दंगा , मस्ती, धमाल या सर्व गोष्टी तर आल्याचं . मैत्री चा धागा हा अतूट असतो . तो कधीही तुटत नाही . आणि मित्र -मैत्रिणी समवेत घालवलेले क्षण आपण जीवनामध्ये कधीही विसरू शकत नाही. मैत्री बद्दल बोलायचं म्हटलं कि शब्द अपुरे पडतात . आणि माझे  मित्र -मैत्रिणी म्हणजे काय एक धमाल ,मस्तीच  पँकेज ..........
                 
                  माझा सर्व मित्र -मैत्रिणी ना आणि मला ही  समुद्र किनारा  खूप आवडतो. आणि समुद्र किनारा म्हटलं   की कोकण आणि कोकण म्हटलं की  कोणाला आवडणार नाही ,नाही का ? म्हणून आम्ही श्रीवर्धन ठिकाण निश्चित केले . कोकणात जाण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे जानेवारी व फेब्रुवारी महिना , या वेळी तिथलं वातावरण खूप छान असतं . म्हणजे  खूप उकाडा पण नसतो आणि थंडीही नसते . आणि सुट्टी नसल्याने स्टॉक सिझन असतो .गर्दी पण कमी असते . त्यामुळे आम्ही फेब्रुवारी महिन्यात गेलो होतो.'
                 
                   श्रीवर्धन खूप सुंदर ,निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे रायगड जिल्ह्यात वसलेले श्रीवर्धन हे पर्यटकांच्या सर्वाधिक आवडीच्या काही ठिकाणांपैकी एक आहे,प्रत्येक ठिकाणाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला असतो .  तसेच  श्रीवर्धनला  एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला 'श्रीधर' म्हटले जाते. त्या ‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे ‘श्रीवर्धन’. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव-रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव आहे. श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्त्वाचे बंदर होते.या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णूमूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत. सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे.असे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले हे  ठिकाण.सध्याच्या वर्षांमध्ये या समुद्रकिनार्‍याला लोकप्रियता मिळाली आहे, म्हणूनच आपल्याला आठवड्याच्या शेवटी विशेष सभ्यता येईल.

या समुद्रकिनार्‍यावर घोडा गाडी  ,पॅराग्लाइडिंग, नौकाविहार आणि पाण्याचे सर्फिंग सारख्या पाण्याचे क्रीडा क्रियाकलाप आढळून येतात ,आणि पाणी उथळ असल्याने पोहण्यासाठी देखील ते परिपूर्ण आहे. श्रीवर्धनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे आहेत.हरिहरेश्वर, दिवआगार, कोंडावली आणि श्रीवर्धन अशी ओळीने असणारे समुद्रकिनारे या भागात फिरण्याचा आनंद वाढवतात. शांत समुद्र,  मऊ वाळू आणि आजूबाजूचा डोळ्यांना सुखावणारा निसर्ग ,तसेच समुद्र किनाऱ्या लागत बसण्यासाठी केलेली सोय आणि समुद्र किनाऱ्या भोवतालचा स्वच्छ परिसर हे श्रीवर्धनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे .कोकणात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आमराई, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्या जोडीला समुद्र यामुळे इथे येऊन पर्यटकांची निराशा होत नाही. त्यामुळेच हे एक लोकप्रिय टुरीस्ट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबरीने श्रीवर्धनमध्ये मिळणारे कोकणी पद्धतीचा मत्स्याहार हे इथे येणाऱ्या  खवय्याला आकर्षित करते. श्रीवर्धन हे दोन दिवसाच्या वीकेंडसाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्याचे सुरूवातीचे वादळी दिवस वगळता वर्षभरात कधाही भेट देता य़ईल. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याबरोबरच जवळअसणाऱ्या दिवेआगार आणि हरिहरेश्वर या दोन देवस्थानांना भेटी देता येऊ शकेल. दिवेआगारला सुवर्णगणेशाचे मंदीर तर हरिहरेश्वरचे महादेवाचे मंदीर ही दोन्ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.
               
        समुद्र म्हंटल की  आपल्या डोळ्यासमोर दृश्य येत ते खळखळणाऱ्या  लाटा आणि भणभणा  वारा ! समुद्राकडे पाहिलं की , असं  वाटतं  कसा आणि कुठवर पसरला आहे हा ? दूर वर समुद्रकडे बघत बसले की तास - दोन तास असेच निघून जातात .आणि समुद्राच्या पोटात आपली सारी दुखं ,चिंता आपोआप मिटून जातात . त्या अथांग लाटा आपल्याला खूप काही शिकवून जातात . समुद्राच्या लाटा बरोबर येणारे निर्माल्य किंवा अन्य काही आसल तर ते बाहेर फेकलं जातं ,यातून अशी शिकवण मिळते की , जे काही छान आहे ते ठेवा बाकीचं फेकून द्या ,रात्रीच्या मंद चांदण्यात समुद्राकडे बघत बसलं तर अभूतपूर्व आनंद मिळतो , खरंच समुद्र खूप काही देऊन जातो आपल्याला .लहान मुलांना तो अवखळ मित्र वाटतो .त्याच्यात डुबण्याचा तो आनंद घेतो .तर युवकांना  ''रुपेरी वाळूत, माडाच्या बनात ये ना ..... " अशा गाण्याप्रमाणे अवखळ जोडीदाराचा भास समुद्रात होतो . मध्यम वयाच्या माणसांना अगदी भिजायला आवडत नसलं तरी पाण्यात पाय बुडवून तरी समाधान मिळत . तर वृद्ध किंवा ज्यांना डुंबयाला आवडत नाही त्यांना समुद्र किनारी बसलं तरी तितकंच प्रफ़ुल्लीत वाटतं. कोकण हा निसर्गाने परिपूर्ण नटलेला , हिरवीगार गर्द झाडी , फुलापानांनी भरलेली ,नारळाची उंचच्या उंच झाडे ,भल्यामोठ्या डोंगररांगा ,इंद्रधनुष्याचे पडलेले रंग ,निळसर आकाश , आकाशामध्ये उडणारा पक्षांचा थवा , थंड गार वाहणारा वारा ,मातीची कौलारू घरे ,घरांन समोर रांगोळी चा सडा ,त्यात मातीचा पसरणारा सुगंध , सूर्योदयाच्या वेळीचा  हा  अनुभव  मनाला सुखावून जातो .एकंदरीत काय तर समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद अवर्णनीय आहे . तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छीमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही, नाही का !कोकणचे निसर्ग सौंदर्या बरोबरच                                                       
     कोकण खाद्य संस्कृती खूप प्रसिद्ध आहे . कोकणाला समुद्र किनारा लाभला असल्याने कोकणी लोकांचे मासळी भात हा  मुख्य आहार मानला जातो . विविध प्रकारचे मासे आपणाला कोकणात खाण्यास मिळतात .त्यामुळे मांसाहारी विशेषतः मासे खाणाऱ्यांची  कोकणात खूप चंगळ असते.  मला मांसाहार खूप आवडतो. कोकणात गेले की मनसोक्त मासे खायचे हे मी आधीच ठरवले होते त्यामुळे मी मासे वर खूप ताव मारला ,कोकणात  आम्हाला मासाचे विविध प्रकार  पाहावयास  मिळाले .श्रीवर्धनच्या समुद्र किनारी मासे मारी मोठ्या प्रमाणात होते . मच्छीमार समुद्रातून टोपल्या भरून मासे जहाजातून आणतात आणि त्याचा लिलाव होतो .  
             त्यात वेल्ली ,बोंबील,सौन्दाळो,हलवा-सरंगा,शेंगाट,बांगडूले,,शेंगाट,सुरमई ,चीन्गुळ,तारली,घोळ,खरा बांगडा ,ओले बांगडा,मांदेली,पापलेट,रावस, लाल सुकट ,सुकट , झींगा ,कोळंबी ,खेकडा असे विविध प्रकारचे मासे पहावयास मिळाले. बरोबरच  सोलकडी , सुरळीच्या वड्या , उकडीचे मोदक , कालवण ,आळुवडी तांदळाची भाकर हे देखील पदार्थ तितकेच प्रसिद्ध आहेत . आम्ही श्रीवर्धन ला पोहचलो कि किनारा लागत रिसॉर्ट बुक करतो .आणि थोडी विश्रांती घेऊन मासळी बाजारात मासे आण्यासाठी जातो.

         कोकणात  हॉटेल फारसे नसले तरी घरगुती निवास स्थाने खूप आहेत . अलीकडे कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने कोकण विभाग बराच डेव्हलप झाला आहे.   त्यामुळे निवासाची कसलीच चिंता नाही . कोकणात घरगुती निवास स्थाने खूप सुंदर पाहावयास मिळतात . निवासा सभोवताली हिररवीगार झाडी , अंगणात बसण्यासाठी झोपाळे , आजूबाजूला स्वच्छ परिसर , वॉशरूम ची वेवस्था , विशेष म्हणजे घरगुती कोकणी मालवणी  जेवण  कॉन्टिटी नुसार बनवून दिले जाते . आम्ही मासे जे आम्हाला आवडतात ते  आणून दिले होते.  त्यांनी आम्हाला मालवणी पद्धतीने उत्तम प्रकारे बनवून दिले त्याची चव आजून जिभेवर रेंगाळत आहे . एकंदरीत काय कि तेथे आमची उत्तम प्रकारे त्यांनी सोय केली .  महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीची देणगी लाभली आहे .त्यामुळे इथे पर्यटक मोठया प्रमाणात येतात . पर्यटकांच्या प्रवासाचे येथे सार्थक होते .असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.आम्हाला तेथून परतीच्या प्रवासाला निघावेसे वाटतच नव्हते , आजून हि तेथे अनुभवले क्षणात मी रमून जाते .हे क्षण तुम्हीही अनुभवा !
                मी आणि  माझा मित्र- मैत्रिणींनी कोकणची ट्रीपचा मनमुराद आनंद घेतला . या सहली मध्ये अनुभवलेले क्षण हे माझा जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरले  ,  मग कधी निघताय  कोकणचे निसर्ग सौंदर्य अनुभवायला .





































     

बाप का बापडा ?                   स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते . आणि पतीचा हात धरते . पस्तीशी चाळीशीपर्यंत त...