एकच !
एकच चहा , तो पण कटींग ......
एकच पिक्चर , तो पण टॅक्स फ्री ......
एकच साद , ती पण मनापासून ....
अजून काय हवे असते मित्राकडून ....
एकच कटाक्ष , तो पण हळूच ......
एकच होकार , तो पण लाजून .....
एकच स्पर्श , तो पण थरथरून .......
अजून काय हवे असते प्रियेकडून .......
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून ....
एकच जोरदार धपाटा , तो पण शिवा हासडून ....
अजून काय हवे असते आजीकडून .....
एकच मायेची थाप , ती पण कुरवाळून ......
एकच गरम पोळी , ती पण तूप लावून ........
सतत आपली काळजी , ती पण डोळ्यात आसवे आणून ........
अजून काय हवे असते आईकडून ......
एकच कठोर नकार स्वराचाराला , तो पण हृदयावर दगड ठेऊन ......
एकच सडेतोड उपदेश , तो पण घोगऱ्या आवाजातून ......
एकच नजर अभिमानाची , ती पण आपली प्रगती पाहून .....
अजून काय हवे असते वडिलांकडून ......
सगळ्यांनी खूप काही दिले , ते पण न मागून .......
स्वर्गच जणू मला मिळाला , तो पण न मरून ....
फाटकी ही झोळी माझी , ती पण वाहील भरून .....
अजून काय हवे मला आयुष्याकडून ......